मुंबई म्हणजे क्रिकेट अन क्रिकेट म्हणजे मुंबई.अगदी गल्लीबोळ्यापासून ते खुल्या मैदानावर ....अगदी रितसर... ढुंगणाच्या अगदी दोन हात लांबवर.....पिचवर गाढलेले स्टंप्स...अशा भल्या मोठ्या खुल्या मैदानात भल्या गर्दित...अन त्यातच एखाद्या ने चुकून बॉल अड़वला तर शिव्यांची लाखोळी वाहत खेळला जाणारा हा लोकप्रिय खेळ.असा हा खेळ खेळत असताना बॉल सिमेरेषेपार कमी पर गटारात मात्र जास्त डूबकायचा...आजला क्रिकेटची पाने थोड़ी रिवर्स स्वीप मधे पलटली तर मुंबईत क्रिकेट खेळणारयाने गटारातले बॉल काढले नाहीत म्हणजे त्याने हातात बॅट पकडली नाही असा साधा , सोप्पा , सरळ अन ढोबळ हिसाब.

अगदी लहनपणी मोठ्या मुलांत खेळयाची हौस भारी.मोजून दोन चार बॉल खेळायला मिळायचे अन बदल्यात बॉल गटारात गेला की मोठी पोर बकोटया पकडून गटारात सोडायचे. मग तो मातीचे ढिगारे उचलणाऱ्या फोकल्यान (JCP) प्रमाणे बॉल दोन पायांच्या पंज्यात पकडून थेट बाहेर...हळू हळू वेळ पुढे सरकत गेली तशी आम्ही भी एकदम प्रोफेशनल झालो....पुढे पुरोगामी फोकल्यानची जागा तंत्रशुध्द टेक्निकने घेतली ...बारीक तारेला बॉल च्या आकाराचा विळखा देवून अथवा एखादया श्रीखंडाच्या डब्याला काठी बांधून बॉल काढण्याची कला प्रचलित झाली....अगदी काहीच नाही भेटल तर दोन बॅटींचा सपोर्ट घेवून किंवा हातात पल्स्टिक ची पिशावि घालून बॉल काढला जायचा...त्याकाळी सेनेटाइजर नसल्यामुळे प्लास्टिक च्या पिशव्यांना भारी डिमांड होता

GB1

घराच्या बाजुलाच मैदान होत अन मैदानाला बिलगुन एक तलाव कम गटार...खर ते तलावच होत पण वाढत्या लोकसंख्यने त्याला गटाराचे कुरूप दिले.अशा या गटारात थोडा लांबीवर बॉल गेला की .....जस कृष्णाला आपल्या पाण्यात गेलेल्या चेंडूंचा मोह होता...अगदी तसाच मोह आम्हा मुलांना होता....मैदानावर बिल्डिंग कंट्रकशन साठी आणलेल्या वीटा धडा धड पाण्यात भिरकवल्या जायच्या अन चेंडू किनारयावर आणला जायचा....पाच रूपयाच्या बॉल साठी धडा धड पाण्यात भीरकावलेल्या सोन्याच्या भावाच्या वीटा पाहून कदाचित विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे कटेवरचे हात डोक्यावर येयाचे बाकी राहिले होते

सरते शेवटी बॉल बोटांच्या चिमटीत पकडून जास्त मगचमारी न करता तळपायांनी जमिनीवर घासुन....एकदा जमिनीवर टमकन उडवून...पुनः खेळाला सुरवात....

थोडक्यात आजला काजू , बदाम , चवणप्राश , खारका यांचा खुराक खाणाऱ्या मुलापेक्षा गटारातले बॉल काढून Naturaly रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यात त्या काळच्या मुलांचा जास्त कल होता

Vaibhav1

Vaibhav Waghe

Proud Indian, Proud Mumbaikar, Son of the Soil. 1st Love Cricket, 2nd Love Tea.. #KhadoosArmy Fan, Gully Cricket Champion.